rachyatidevelopers

Rachayati crown

रचयति क्राउन – असावे घर ते आपुले छान!

घर म्हणजे प्रेमाचं, हक्काचं, विसाव्याचं ठिकाण. आपलं घर ही संकल्पनाच मनाला विसावा देऊन जाते. गृहिणीची विसाव्याची, जिव्हाळ्याची जागा, तसेच पुरुषाची सुद्धा. कारण तिथे असतो निवांतपणा, शांतपणा. दिवसभर ऑफिस मध्ये काम करून थकल्याभागल्या पुरुषाचे पाय ओढीने वळतात ते घराकडेच. तुम्हाला सतत प्रसन्न, हसरे आणि आनंदित ठेवण्यासाठी घ्या हक्काचं ठिकाण, तुमचं घर, तुमचं नंदनवन, तुमचं सुख रचयति क्राउन (Rachayati Crown) मध्येच.

आपलं घर हवंच, पण घर म्हणजे नुसत्या उभारलेल्या भिंतीच नको, नाही का? तर तुमच्या सुखसोयींचा विचार करून, घरात प्रवेश करताच प्रसन्नता वाढेल असेच हे घरकुल आहे. तुमची भरभराट होण्यासाठी यात आम्ही वास्तुशास्त्राचा विचारही केलेला आहे बरं का! घरात प्रवेश करताच पॉझिटिवीटी वाढवणारा आणि हवा, प्रकाश यांनी युक्त असा हॉल; गृहिणीसाठी मनाच्या अत्यंत जवळ असणारे, सर्व सोयींनी युक्त असे स्वयंपाकघर; दिवसभर आणि रात्रीसुद्धा गरम पाण्याची सोय असावी म्हणून सोलर सिस्टिम; लिफ्ट; अनोखी आणि अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग; मुलांसाठी, तुमच्या छकुल्यांसाठी किड्स प्ले एरिया, तसेच वृद्धांसाठी सीनियर सिटीजन एरिया सुद्धा; आणि व्यायामासाठी योगा रूम, कार पार्किंगसाठी जागा, तसेच शुद्ध मोकळ्या हवेसाठी जॉगिंग ट्रॅक सुद्धा असणार आहे.

रचयती-क्राउन (Rachayati Crown) नागपूर highway च्या जवळच, मध्यवर्ती जागी आहे. आमच्याकडे उपलब्ध आहे अगदी आपल्या सगळ्यांसाठीच १/२/३ बी एच के फ्लॅट्स जे तुम्हा सर्वांच्या गरज आणि सोयीनुसार असतील. चला तर बघू या सगळ्या गोष्टी अधिक तपशीलात…

सर्वप्रथम हॉल

येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो तो घरातील हॉल. शिवाय आपल्या सर्वांचच जाणं-येणं  दिवसभर असतं ते हॉलमध्येच. त्यामुळे हॉल प्रशस्तच हवा. पीओपी सीलिंगने युक्त हॉल घर सुंदर करतो, नव्हे घराची शोभाच वाढवतो. अशा सुंदर हॉल मध्ये असलेल्या डायनिंग एरिया मध्ये जेवण घेण्याची मजा काही औरच. एक-दोन दिवस नाही, तर तुम्ही हा आनंद नेहमीच लुटू शकता कारण केवळ तुम्हाला आनंदित ठेवावे अशा दृष्टीने आम्ही तुमचं घर तुमच्या हवाली करत आहोत.

स्वयंपाक घर

स्वयंपाकघर हा घराचा आरसाच जणू. सगळे स्पष्ट दिसण्यासाठी मॉड्यूलर किचन आदर्श मानलं जातं. गृहिणींना मनासारख हवं असतं ते स्वयंपाक घर. सहजतेने वावरण्यासाठी, आवश्यक ती वस्तू पटकन घेता यावी यासाठी कमी जागेत, पण सर्वच लागणाऱ्या गोष्टी हव्यातच की घरात. ते केवळ साध्य होऊ शकतं मॉड्यूलर किचन मुळेच. गृहिणींना अभिमान असणारी आणि  मनोमन नेहमीच हवीशी वाटणारी संकल्पना प्रत्यक्षात साकारतोय भगिनींनो केवळ तुमच्यासाठीच… तुमचा अभिमान असणारे मॉड्यूलर किचन घेऊन येत आहोत, रचयति क्राउन (Rachayati Crown)…

बेडरूम

अति उष्ण तापमान असलेला आपला विदर्भ भाग, शिवाय पाण्याची टंचाई ही नेहमीचीच. गच्चीवर झोपून थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवणे सुद्धा आजच्या काळात अवघडच आणि अति तापमानामुळे आपल्या भागात अशक्यच आहे. पण कधीतरी ते ही हवंच ना! हवेतील गारवा, थंडगार वाऱ्याची झुळूक देऊन तुमची झोप सुखकारक करतोय ए सी बेडरूम देऊन. रात्री शांत झोप घ्या आणि अनुभवा  दुसऱ्या दिवशी सकाळची प्रसन्न पहाट…

सोलर सिस्टिम

सूर्य देवता आपल्यावर प्रसन्न असल्याने तुमच्यासाठी खास घेऊन येतोय सोलर सिस्टिम. तुम्ही नक्कीच खूष व्हाल कारण दर महिन्याला येणारे भरभक्कम विजेचे बिल तुमचं टेन्शन एकदम कमी करणार आहे. कारण विजेचे प्रचंड बिल तर वाचेलंच शिवाय मुबलक प्रमाणात मनसोक्त गरम पाण्याची देखील सोय होणार आहे, तेही दिवसभर. दिवसभर असणाऱ्या गरम पाण्यामुळे तुम्ही कधीही फ्रेश होऊ शकता…

रेन वॉटर हार्वेस्टिंग

घरात राहूनही निसर्गाची काळजी आपण घेऊ शकतोच की सुजाण नागरिक बनून. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्लॅन त्यासाठीच. तसंही विदर्भात पाऊस कमीच. त्यामुळे नेहमीच आपल्या भागात पाण्याचा तुटवडा असतो, दुष्काळच म्हणाना. आणि म्हणून पावसाचे वाया जाणारे गच्चीवरचे पाणी वाया न घालवता उपयोगात आणून, तेच पाणी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी आम्ही ही सिस्टीम घेऊन आलो आहोत. आजूबाजूच्या ठिकाणचे पाणी आपोआच जमा होईल अशी रचना  करून घरच्या बोर मध्ये साठवूया. कधीही पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून आणि केवळ म्हणूनच अनोखी उपयुक्त गोष्ट म्हणजे हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, तेही आम्ही तुम्हाला देण्यात येणाऱ्या गोष्टीत सामील करतोय.

किड्स प्ले एरिया

सध्याचे वातावरण बघता घराबाहेर पडता येणे अशक्यच. घरातल्या घरात दिवसभर राहून मुलंही कंटाळतात, त्रास देतात. ह्या तुमच्या पिल्लांची तुम्ही काळजीच करू नका. कारण आम्ही त्यांना गुंतवून ठेवू किड्स प्ले एरिया देऊन. मनसोक्त खेळू द्या, बागडू द्या तुमच्या बालगोपाळांना. त्यांना मनसोक्त बागडताना पाहून तुम्ही खूष आणि बालगोपाल देखील खूष…

सिनियर सिटिझन एरिया

नातवंडाचे आजी-आजोबा म्हणजे घरातील सर्वात अनुभवी लोक. या महत्त्वाच्या लोकांना आम्ही कसं विसरणार? आजी-आजोबांना सुद्धा दिवसभर घरात राहून कंटाळा येणारच की, बाहेर जावंसं वाटेलंच की, आणि समवयस्कांशी गप्पा देखील माराव्या वाटणारंच की. ते आनंदी राहावे म्हणून खूप त्यांच्यासाठी खास विचार करून बनवले सिनियर सिटिझन एरिया. तिथून  फ्रेश होऊन आले की घरी येऊन छान छान गोष्टी सांगतील नातवंडाना…

जॉगिंग ट्रॅक/योगा रूम

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही, घरातले कर्ता पुरुष व घर सांभाळणारी गृहिणी. अतिशय महत्वाचे असे कुटुंबाचा कणा असणारे तुम्ही तर खणखणीत असायलाच हवं. त्यासाठी तर फिरणे, व्यायाम करणे आवश्यक. पण रस्त्यावरची ही ssगर्दी. मग बाहेर जायचा येतो कंटाळा. पण थांबा. असा कंटाळा नका करू, कारण सोसायटीतच देतोय तुम्हाला तुमच्या साठी जॉगिंग ट्रॅक. हिवाळा उन्हाळा पावसाळा कोणताही ऋतु असो, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून आणखी एक  सुविधा देतोय जोडीला, ती म्हणजे छानशी योगारूम.  तुमच्या छोटुकल्यांना सुद्धा तुमच्यासोबत योगा करताना आनंद घेता येईल.

लँडस्केप गार्डन पार्क

घराच्या खिडकीत उभे राहिले की बाहेर दिसणारी झाडे, फुले, पाणी, झाडावर बसणारे पक्षी, पक्ष्यांचा मधुर आवाज मन कसं वेधून घेतात. हा सगळा वनात राहण्याचा अनुभव घ्या आणि लुटा निसर्गाचा आनंद घरातच बसून, खिडकीच्या बाहेर बघून तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात.

वास्तुशास्त्र

घराला घर पण देणारे, मानसिक शांती टिकवून ठेवणारे, आपुलकी जपणारे घर म्हणजेच सुख समाधान असणारी वास्तू तयार होते ती वास्तुशास्त्राच्या आधारे. म्हणूनच आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी, भरभराटीसाठी वास्तुशास्त्राचा आधार घेऊनच हे घर तयार केले आहे. तेव्हा निर्धास्तपणे प्रवेश करा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या वास्तूत, घरकुलात; रचयती क्राउनमध्ये (Rachayati Crown). म्हणतात ना, “असावे घर ते आपुले छान”…

Rachayati Crown is 1, 2, & 3 BHK luxurious flat scheme in Amravati that has got amenities and facilities like never before. Developed by a team of architects and developers from Mumbai, it is so well designed along with qulaity construction, top-notch branded material in one of the fastest-growing areas in Amravati. Contact us today to book your dream flat in Rachayati Crown.

Rachayati Crown Project Details:

RERA NO: P50300028865

Location: Rachayati Crown, Near Nagpur Highway, Arjun Nagar, Amravati (Fast Growing Area)

Contact: 7030193838

Email: sale.rachayati@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now
Open chat
Hello
How Can I Help You?