rachyatidevelopers

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया: तुमच्या स्वप्नातील घर बुक करण्यासाठी शुभदिवस

अक्षय तृतीया

आपण भारतीय उत्सव प्रिय. सण हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यच. कोणतंही शुभ कार्य करतांना आपण मुहूर्त पाहतो, मात्र अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरजंच नाही, कारण हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे चिरकाल टिकणारे, शाश्वत. थोडक्यात ज्याचा कधी क्षय, नाश होत नाही असे. म्हणूनच आपण मोठी खरेदी किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करतो, ती आजच्या दिवशी, कायम टिकण्यासाठीच.

असे म्हणतात, कुबेराने याच दिवशी लक्ष्मीची संपत्तीसाठी प्रार्थना केली होती आणि तो स्वर्गातील संपत्तीचा राजा, स्वामी झाला. भगवान गणेशाने सुद्धा या दिवशी महाभारत लिहिण्यासाठी सुरुवात केली असे सांगतात. कृष्णाने देखील युधिष्ठिराला याच दिवशी दानधर्म करण्यास सांगितले होते, असे दान जे कधीही लोक पावणार नाही, कायमच उत्तरोत्तर वाढत राहील.

आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये सुद्धा अक्षय तृतीयेचे महत्त्व वर्णन करण्यासाठीअनेक प्रसंग दिलेले आहेत. आपले आजी आजोबा सुद्धा या दिवसाचं महत्त्व आपल्याला नेहमीच सांगत असतात. एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील सर्वच जातीचे लोक या स्पेशल दिवशी मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, घर विकत घेतात. येणाऱ्या नवीन वर्षात याच दिवशी तुमचंही घरकुल घेण्याचं स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. वाचा पुढील चार कारणं ज्यामुळे या दिवशी येणारी ही संधी तुम्ही मुळीच सोडणार नाही.

1. अक्षय तृतीया – महत्वाचा पर्व, शुभमुहूर्त

असं म्हटलं जातं, घर विकत घेणे आणि लग्न करणे या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात एकदाच होतात आणि आपण भारतीय या दोन्ही गोष्टींबद्दल अतिशय संवेदनशील आहोत, भावनाप्रधान आहोत. घर घेणं ही गोष्ट आपल्यासाठी खूपच महत्त्वाची असते कारण आपण आपले सगळेच सेव्हींग्ज आणि इन्वेस्टमेंट्स यासाठी वापरतो. अक्षय तृतीयेला खरेदी केलेली कुठलीही गोष्ट प्रॉफिटच देऊन जाते. विशेषता तुम्ही जर आयुष्यातला पहिला फ्लॅट खरेदी करत असाल तर खरंच यासाठी या सारखा दुसरा सोनियाचा दिन नाही.

2. भरभक्कम सवलती

घरासारखी मोठी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी प्रत्येक भारतीय या दिवसाची वाट बघतोच. आणि असेच बिल्डर्स, डेव्हलपर्स देखील या पवित्र दिनाचे औचित्य साधून अनेक ऑफर्स, भरपूर डिस्काउंट्स देतात. आणि म्हणूनच आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांना स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी यासारखा दुसरा दिवस मिळणे अवघडच. हा सण, हा काळ कायमंच भक्कम फायदा देणारा राहतो.

3. वास्तुशास्त्र आणि शुभुमुहूर्त

घर ही पवित्र वास्तू. घरातील प्रत्येक व्यक्तीचे घराशी अनोखे धागेदोरे जोडलेले असतात. ऋणानुबंधच म्हणा ना. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार निर्माण केलेली ही वास्तू, आपल्या घरात रूपांतरित करा. निरामय आयुष्य , भरभराट, शरीर व मन प्रसन्न ठेवणे, तंदुरुस्त ठेवणे, परस्परांशी रेशीमबंध निर्माण करणें, घरातील वातावरण हसत-खेळत ठेवणे हे या वास्तूचं काम. अक्षय तृतीया या पावनदिनी खरेदी केलेली ही वास्तू म्हणजे “सोन्याला हिऱ्याचे जणू कोंदणच”.

4. महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट

पूर्वीच्या काळी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते, सोने नाहीतर जमीन. पण पूर्वी जमिनीत केलेली इन्व्हेस्टमेंट फारसा फायदा मिळवून देत नसे. मध्यंतरीच्या काळात लोक बँकेत पैसे ठेवत, परंतु सध्या मात्र अशी परिस्थिती आहे की इन्वेस्टमेंट करायला बँक्स सुद्धा परवडत नाही, व्याज अतिशय कमी दराने मिळते. सोनं घेणेसुद्धा फारसा लाभ देत नाही, तेव्हा घरातच पैसा गुंतवणे चांगले रिटर्न्स देऊन जाते. आता  डबल फायदा, एकतर भाड्याच्या घराचे पैसे वाचतात शिवाय घर  ही मोठी प्रॉपर्टी ही होऊन जाते.


We at Rachayati, have Rachayati Crown – a 1, 2 and 3 BHK flat schemes in Amravati. Contact us today.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now
Open chat
Hello
How Can I Help You?